dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वाढोणा शिवारातील कालिंका देवी डोंगरात दोघांची आत्महत्या

धावडा : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावाजवळील वाढोणा शिवारातील कालिंका देवी डोंगर परिसरात रविवार, 9 नोव्हेंबर रोजी सकाळी एका महिलेसह दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दोघांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. माहिती मिळताच पारध पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 जयाबाई पाडुरंग गवळी (38) , रा. वालसांवगी, ता. भोकरदन, जि. जालना, गणेश उत्तम वाघ (24) रा. वालसांवगी, ता. भोकरदन, जि. जालना असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांचेही मृतदेह वाढोणा शिवारातील डोंगरावरील सागाच्या झाडाला एकाच फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी सांगितले की, दोघांनीही गळफास घेण्यासाठी एकाच झाडाला बांधलेला पांढऱ्या रंगाचा दोर आणि लांब रुमाल वापरला होता. पारध पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार एस.बी.जावळे हे करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top