‘वारी’ ही अहंभाव विसरून समभाव निर्माण करणारी वारकरी संत साहित्य संमेलनातील ‘ टाॅक शो’ मधील मंथन

जालना :  पंढरपूरची वारी ही अहंभाव विसरून समभाव निर्माण करणारी असून वारीतून जातमुक्त अभियान राबविले जात असल्याचा सूर रविवार,14 डिसेंबर रोजी वारकरी संत साहित्य संमेलनातील ‘टाॅक शो’ कार्यक्रमातून निघाला. 

जालना :  पंढरपूरची वारी ही अहंभाव विसरून समभाव निर्माण करणारी असून वारीतून जातमुक्त अभियान राबविले जात असल्याचा सूर रविवार,14 डिसेंबर रोजी वारकरी संत साहित्य संमेलनातील ‘टाॅक शो’ कार्यक्रमातून निघाला. 

       ‘ रिंगण’ चे संपादक सचिन परब, सुप्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे, प्रयोगशील नाट्यकलावंत ऋचिका खोत यांनी या ‘ टाॅक शो’ मध्ये भाग घेतला. विश्वाधर देशमुख हे या कार्यक्रमाचे संवादक होते. 

     यावेळी बोलताना सचिन परब यांनी पंढरपूरच्या वारीतील रिंगण सोहळा व वारीतील वारकरी मंडळीची भावना लक्षात घेऊन आपण ‘ रिंगण’ या नियतकालिकाचे निर्माण केले. रिंगण सोहळा हा वारीतील मुख्य सोहळा असतो. हा रिंगण सोहळा शब्दबद्ध करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. पंढरपूर वारीचे महत्त्व हे आध्यात्मिक, सामाजिक आणि आरोग्यदायी आहे; ती विठ्ठल भक्तीचा एक महासोहळा असून संतांच्या शिकवणीनुसार जातीधर्माच्या पलीकडे जाऊन एकतेचा संदेश देते. ज्यात वारकरी पायी चालत जाऊन मन-शरीर शुद्ध करतात. अहंभाव विसरून समभाव वाढवतात आणि नामस्मरण व भक्तीने मोक्षप्राप्तीची कामना करतात, असे मानले जाते, असे ते म्हणाले. 

 यावेळी बोलतांना संदेश भंडारे म्हणाले की, पंढरपूरच्या वारीचा सोहळा हा अनेक पत्रकार शब्दबद्ध करीत असतात आपण वारी व वारीतील रिंगण सोहळा हा कॅमेऱ्यात कैद करीत आलो आहोत. शब्दापेक्षा चित्राची भाषा लवकर कळते, असे ते म्हणाले. 

    या कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लहवितकर , माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, अभिमन्यू खोतकर, विष्णु पाचफुले, बाबुराव व्यवहारे, पुरूषोत्तम मोतीवाला, सुदेश करवा, अनूराग कपूर, डॉ. अनुराधा राख, डॉ. सुजाता देवरे, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, कार्यवाह डॉ. यशवंत सोनुने, डॉ.दिलीप अर्जुने, डॉ. एकनाथ शिंदे, डॉ. राजेंद्र सोनवणे, वारकरी संत साहित्य संमेलनाचे पदाधिकारी, वारकरी आदींची उपस्थिती होती.

मानव कल्याणाचा प्रमुख मार्ग

        यावेळी ऋचिका खोत म्हणाल्या, वारी म्हणजे विठ्ठलाच्या भेटीसाठी केलेली पदयात्रा, जी मनातील सर्व विकार दूर करून आत्मशुद्धी घडवते आणि मोक्षप्राप्तीसाठी मदत करते. आमच्या कीर्तावणीचा प्रवासही पंढरपूरच्या वारीतून घडला आहे. वारीतील अनुभव शिवाय संत परंपरा, संताची शिकवण आणि महाराष्ट्रातील लोककला याचा मिलाप कीर्तावणीतून घडवून आणला आहे. महाराष्ट्रातील संत साहित्य, संत परंपरा, वारी ही मानव कल्याणाचा प्रमुख मार्ग असल्याने ही परंपरा जतन करण्याचा सूरही या टाॅकशो मधून निघाला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »