शेगावात २५ फेब्रुवारीला ‘आयुष’ चे राष्ट्रीय आरोग्य महासंमेलन;  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते उद्घाटन

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील आध्यात्मिक स्थळ असलेल्या शेगाव येथे आयुष मंत्रालयाचे तीन दिवसीय राष्ट्रीय आरोग्य महासंमेलन होणार आहे.  शेगावातील आनंद सागर परिसरातील भव्य प्रांगणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आल आहे.

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्राताई पवार राहणार उपस्थित 

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील आध्यात्मिक स्थळ असलेल्या शेगाव येथे आयुष मंत्रालयाचे तीन दिवसीय राष्ट्रीय आरोग्य महासंमेलन होणार आहे.  शेगावातील आनंद सागर परिसरातील भव्य प्रांगणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आल आहे. राष्ट्रपती द्रोपदी मूर्म यांच्याहस्ते २५ फेब्रुवारी रोजी  संमेलनाचे उद्घाटन होणार असून, याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार यांची उपस्थिती राहील.  याशिवाय, आरोग्य व विशेषतः आयुर्वेदा क्षेत्रातील देशातील दिग्गज मान्यवर उपस्थित असतील.  आयुर्वेदिक उपचार पद्धत,  पारंपारिक औषधोपचार या बाबींचा प्रचार प्रसार करून आयुर्वेदाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हे राष्ट्रीय शिबिर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात प्रदर्शनी, आरोग्य शिबिर तसेच मार्गदर्शन शिबिरांचा सहभाग असणार आहे. या माध्यमातून, हजारो नागरिकांना लाभ मिळेल असा विश्वास केंद्रीय आयुष तथा कुटुंब कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला. आज ७ जानेवारी रोजी शेगाव येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कामगार मंत्री आकाश फुंडकर, बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »