dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

खुनाच्या घटनेला सावकारीची किनार!;बुलढाणा हादरले, भरचौकात सपासप वार.. 

अंढेरा: चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील चौफुलीवर भरत विरशीद (वय ४०, रा. नांद्राकोळी, ता. बुलढाणा) याची धारधार शस्त्राने वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची घटना आज, २३ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याघटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  याघटनेमागे सावकारीची किनार असल्याचे बोलले जात आहे. 

नंदकिशोर देशमुख / अंढेरा: चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील चौफुलीवर भरत विरशीद (वय ४०, रा. नांद्राकोळी, ता. बुलढाणा) याची धारधार शस्त्राने वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची घटना आज, २३ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याघटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  याघटनेमागे सावकारीची किनार असल्याचे बोलले जात आहे. 

या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले असून, अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्राप्त  माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील एकाने मृत भरत विरशीद याला १० लाख रुपये सावकारीवर दिले होते. मात्र, या पैशांच्या परतफेडीवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादातूनच भरतच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात भरत गंभीर जखमी झाला असून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस ठाण्याचे कर्मचारी भरत पोफळे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीस ताब्यात घेतले. सध्या पोलिस आरोपीची कसून चौकशी करत असून, ही हत्या सावकारीच्या पैशातून झाल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top