The explosion of the cylinder caused a huge fire
: स्थानिक अंधेरी पूर्वेतील असलेल्या एमआयडीसी परिसरात भंगारवाडीमध्ये चार ते पाच लाकडाच्या दुकानात मोठी आग लागल्याची घटना एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:30 च्या सुमारास घडली.
मुंबई: स्थानिक अंधेरी पूर्वेतील असलेल्या एमआयडीसी परिसरात भंगारवाडीमध्ये चार ते पाच लाकडाच्या दुकानात मोठी आग लागल्याची घटना एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:30 च्या सुमारास घडली. एमआयडीसी भंगारवाडी परिसरात चार ते पाच गळ्यात मोठी आग लागली. लाकूड गोदाममध्ये सिलेंडर ब्लास्ट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गाळे आहेत, आणि या गाळात केमिकल आणि लाकूडचा गोदाम असल्यामुळे 8 ते 10 गाळ्यात आग वाढली आहे. आगीचे वृत्त समजताच स्थानिकांनी अग्निशमन दलास पाचारण केले. तसेच, परिसरातील नागरिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.