dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

कुंभार पिंपळगावातील तरूणाचा किनगावराजा हद्दीत मृतदेह आढळला: जालना जिल्ह्यातून अपहरण; बुलडाणा जिल्ह्यात खून ? 

घनसावंगी :  जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथून शनिवार, 28 जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूल आणि कुर्हाडीचा धाक दाखवून सुरेश तुकाराम आर्दड ( ३३, रा. राजाटाकळी ) या तरुणाचे चार जणांनी रक्त चारचाकी वाहनामध्ये कोंबून अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, अपहरण झालेल्या सुरेश आर्दड याचा रविवार , 29 जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडेगाव – टाकरखेडा रोडवर शेतात मृतदेह आढळून आला. 

      अपहरणकर्त्यांनी सुरेश आर्दड यांचा खून करून त्याचे प्रेत दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन फेकून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सुरेश आर्दड यांचे चुलत भाऊ सुभाष आर्दड यांच्या फिर्यादीवरून हरी कल्याण तौर, सखाराम उर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड ( रा. राजा टाकळी ), मिनाज बाबामिया सय्यद ( रा. कु. पिंपळगाव ) आणि चारचाकी वाहनाचा चालक या चार जणांविरुद्ध अपहरण आणि शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top