भरधाव दुचाकीची डिव्हायडरला धडक, तिघे जखमी 

मलकापूर :  मध्यप्रदेश मधील इच्छापुर येथे देवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या दुचाकी स्वरांची मोटरसायकल डीवाईडरला धडकल्याने झालेल्या अपघातात खामगाव तालुक्यातील तीन युवक गंभीर स्वरूपाने जखमी झाल्याची घटना 18 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान मलकापूर ते मुक्ताईनगर महामार्गावर घडली.

          खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी येथील मंगेश बुंदे (22), अजय बंड (22) आणि धीरज इंगळे हे तिघे मित्र दुचाकी क्रमांक एम एच 56- 1406  वरून 18 जानेवारी रोजी सकाळी मध्य प्रदेश येथील इच्छापुर येथे इच्छा देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. परंतु वाटेत मलकापूर ते मुक्ताईनगर दरम्यान त्यांची भरधाव दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने तिघेही अपघातात जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी त्यांना इच्छापुर येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती केले होते. परंतु त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना उपचारासाठी खामगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून तिघांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »