dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पुन्हा चोरीसाठी आला अन् एलसीबीच्या जाळ्यात अडकला : दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा; आरोपीला बेड्या

वाशिम : जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत मोटारसायकल चोरीच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची चोरीची पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

वाशिम : जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत मोटारसायकल चोरीच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची चोरीची पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला १६ जून रोजी शेलू खडसे (ता. रिसोड) येथील एक युवक वाशिम शहरात मोटारसायकल चोरी करण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे व पथकाने सापळा रचला.

वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात संशयित इसम मोटारसायकल चोरीच्या उद्देशाने थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव सतीश गौतम तुरेराव (वय २२, रा. शेलू खडसे, ता. रिसोड) असे सांगितले. पुढील चौकशीत त्याने फेब्रुवारी महिन्यात वांगी येथून बजाज पल्सर १५० मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली. या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी रोजी   गुन्हा दाखल आहे. आरोपीला पुढील तपासासाठी वाशिम ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याकडून जिल्ह्यातील इतर मोटारसायकल चोरीचे गुन्हेदेखील उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.  पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top