dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

घाटबोरी वन विभागाचा कौतुकास्पद उपक्रम; वन्यजीवांसाठी १६ वन बिटमध्ये ८० वन बंधारे!

डोणगाव :  मागील काही महिन्यांपासून पाऊस नसल्याने वन क्षेत्रामधील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. माणसांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी शासकीय पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र मुक्या वन्य प्राण्यांची व्यथा वन विभागाने गंभीरपणे घेत, घाटबोरी वनविभागाचे उपवनसंरक्षक जमील शेख आणि मेहकरचे सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या संकल्पनेतून घाटबोरी परिक्षेत्रातील  १६ वन बिटमध्ये प्रति बिट ५ याप्रमाणे एकूण ८० वनबंधारे बांधण्यात आले आहेत.

   वन्यजीव संवर्धन व जलसंधारणाला गती देण्यासाठी घाटबोरी वनपरिक्षेत्रात एक  व्यापक मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीची भीषणता पाहता, जंगलातील वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी घाटबोरी परिक्षेत्रातील एकूण १६ बिट मध्ये प्रति बिट ५ याप्रमाणे एकूण ८० वनबंधारे बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हा संपूर्ण उपक्रम स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त लोकसहभाग आणि श्रमदानातून साकार झाला आहे.

 सध्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. अशा तीव्र दुष्काळी परिस्थितीत जंगलातील नैसर्गिक जलस्त्रोत कोरडे पडू लागले आहेत. हे लक्षात घेऊन वेळेतच बांधण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये  वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांच्यासह वनरक्षक शिवनारायण पडघान,भाऊसाहेब खोडवे, सुधाकर गायकवाड, देवराव पवार, अंकुश खेंटे, कौशल्या ढाकणे खुळे, अंकुश बाभुळकर, श्रीराम काकड, नितेश जाधव, निलेश विणकर, गीता घुगे, हिना शेख, पडवळ, गुद्दे, गीते, वीर, मंजुळकर, कल्याणकर, तायडे यांच्यासह घाटबोरी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

वन्य प्राण्यांचा मानवीवस्तीकडे होणारा शिरकाव थांबणार

 ८० वनबंधाऱ्यांमुळे वन्य प्राण्यांची तहान भागविण्यास मदत मिळणार असून, त्यांचा मानवी वस्तीकडे होऊ पाहणारा संभाव्य शिरकाव बहुतांश प्रमाणात थांबू शकतो. एवढेच नव्हेतर, जंगल परिसराला लागून असलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे त्या परिसरात चरणाऱ्या गुराढोरांना सुद्धा पिण्याचे पाणी मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top