Polling begins peacefully in Chhatrapati Sambhaji Nagar district: छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख उमेदवारांनी बजावला आपला हक्क 

Polling begins peacefully in Chhatrapati Sambhaji Nagar district: जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह विविध मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह विविध मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी देखील मतदारांनी केल्या होत्या. मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी त्या मशीन तात्काळ बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू केली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली.

छत्रपती संभाजी नगर शहरातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात काही मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. परंतु सकाळी दहा वाजेनंतर सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावला.  छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येथील मतदान केंद्रात जाऊन सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला.  तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, औरंगाबाद पूर्व मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अतुल सावे, इम्तियाज जलील, अफसर खान, गफार कादरी, लहू शेवाळे, फुलंब्री मतदारसंघातील उमेदवार अनुराधा चव्हाण, विलास अवताडे, मध्य मतदारसंघातील उमेदवार प्रदीप जयस्वाल, डॉ. बाळासाहेब थोरात, नासिर सिद्दिकी, पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संजय शिरसाठ, राजू शिंदे , रमेश गायकवाड यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवर अचानकपणे ईव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या. मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी बराच वेळ खटाटोप करूनही त्या मशीन सुरू न झाल्याने, बंद पडलेल्या मशीन बदलून त्या ठिकाणी दुसऱ्या ईव्हीएम मशीन लावून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »