Opium cultivation in Andhera: अंढेरा येथे अफूची शेती : १५ क्विंटल अफू जप्त, एलसीबीची कारवाई

Opium cultivation in Andhera:

Opium cultivation in Andhera: देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे एका शेतात अफूची लागवड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कारवाई करीत १५ क्विंटल ७२किलो अफू जप्त केला असून, आरोपी संतोष मधुकर सानप ४९ याला अटक केली आहे.

Opium cultivation in Andhera:
अंढेरा (बुलढाणा) : देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे एका शेतात अफूची लागवड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कारवाई करीत १५ क्विंटल ७२किलो अफू जप्त केला असून, आरोपी संतोष मधुकर सानप ४९ याला अटक केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अफू पकडल्याची हे राज्यातील पहिली घटना असल्याची चर्चा आहे. हे कारवाई शनिवार 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आली.
आरोपीने आपल्या शेतात विनापरवाना अमली पदार्थ असलेल्या अफूची लागवड केली होती. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पथकाने उपरोक्त ठिकाणी छापा मारून हे कारवाई केली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये 2011 करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी, देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे, आशिष रोही, रुपेश शक्करगे यांच्यासह आदींनी हे कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »