७८ लाखांची ऑनलाईन फसवणूक; पोलिस असल्याचे सांगून वृद्ध दाम्पत्याला गंडवले

छत्रपती संभाजीनगर :  खाकी पोशाख घालून व्हिडीओ कॉलवर स्वतःला मुंबई पोलिस असल्याचे भासवत, एका ७७ वर्षीय निवृत्त व्यक्तीला तब्बल ७८ लाख ६० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. समर्थनगर येथील अक्षय अपार्टमेंटमधील एकनाथ धोंडोपंत जोशी यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फसवणूक करणाऱ्यांनी जोशी व त्यांच्या पत्नीला फोन करून खोटा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. “तुमच्या पत्नीच्या आधार कार्डाचा वापर करून सिमकार्ड घेतले गेले असून, त्याद्वारे कॅनरा बँकेत खाती उघडली गेली आहेत. त्या खात्यातून २ कोटींचे मनी लॉन्ड्रिंग झाले आहे आणि अब्दुल सलाम या पीएफआय दहशतवाद्याला अटक झाली आहे. त्याने तुम्हाला २० लाख रुपये दिले आहेत, त्यामुळे तुमच्यावर गुन्हा होणार आहे,” असा खोटा आरोप करत त्यांना भीती दाखवण्यात आली.

या खोट्या पोलिस अधिकाऱ्याने जोशी दाम्पत्याला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.  ४ जुलै रोजी ६९ लाख रुपये,   ५ जुलै रोजी  ९ लाख 60 हजार रुपये असे एकूण  ७८ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. जोशी यांच्या तक्रारीनंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फसवणूक करणारे दोन अज्ञात आरोपी मोबाईल वरून संपर्कात होते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »