One dies after crane falls on him: भादोला येथील एका शेतातील विहिरीचे खोदकाम सुरू असताना अंगावर क्रेन पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना १८ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली.
बुलढाणा : भादोला येथील एका शेतातील विहिरीचे खोदकाम सुरू असताना अंगावर क्रेन पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना १८ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील भादोला येथील सेंट जोसेफ शाळेच्या मागील बाजूस वसंता वाघ यांचे शेत आहे. गुरुवारी त्यांच्या शेतात शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. या कामादरम्यान विहिरीत असलेल्या वसंता वाघ त्यांच्या अंगावर लोखंडी क्रेन कोसळली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे