नानाभाऊ जंजाळ शाळेचे गणित ऑलिम्पियाड परीक्षेत यश 

चिंचोली लिंबाजी :  येथील कै.नानाभाऊ जंजाळ पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या गणित ऑलिम्पियाड परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनिय यश मिळवले. गणित ऑलिम्पियाड परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

कन्नड तालुक्यातील चिंचोली-लिंबाजी येथील कै.नानाभाऊ जंजाळ पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या गणित ऑलिम्पियाड परीक्षेत सुमित अधाने, आरोही बावस्कर, अजिंक्य काथार, अमृता घुले, अक्षय्या विखनकर, सौम्या वाघ, तनिष्का जगनाडे, रूद्रा नवघरे, गौरी आहुजा, आराध्या जैस्वाल अनन्या पवार या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. गणित ऑलिम्पियाड परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कै.नानाभाऊ जंजाळ पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक अजित जंजाळ, प्राचार्य सुहास वानखेडे, उपप्राचार्य अंबादास पवार यांच्या हस्ते विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी योगेश जंजाळ, मंदार भुसारी, योगेश दिश्वरे, आजीनाथ गोरे, अब्दुल पठाण, राहुल गोरे, मनिषा साखरे, अर्चना बावस्कर, प्रतिभा जैस्वाल, सुवर्णा जाधव, दिपाली पवार, मनिषा वाढेकर, विद्या सदावर्ते, मंजुषा करंजकर, सोनाली वानखेडे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »