नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले की, मुद्रा योजनेअंतर्गत ३३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे हमीमुक्त कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यामुळे असंख्य लोकांना त्यांचे उद्योजकीय कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या निवासस्थानी निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, यामुळे देशातील तरुणांमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे. त्यांना नोकरी मागणारे बनण्याऐवजी नोकरी देणारे बनण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. सदस्य कर्ज देणाऱ्या संस्थांद्वारे हमी-मुक्त संस्थात्मक कर्ज प्रदान करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ८ एप्रिल २०१५ रोजी पीएमएमवाय सुरू केले. ते म्हणाले, मुद्रा योजनेतील निम्मे लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायातील आहेत आणि ७० टक्क्यांहून अधिक लाभार्थी महिला आहेत हे विशेषतः उत्साहवर्धक आहे.