Protest of ST employees in Buldhana: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बुलढाणा येथे देखील संपाचे तीव्र पडसाद उमटले असून, कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
बुलढाणा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बुलढाणा येथे देखील संपाचे तीव्र पडसाद उमटले असून, कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
सकाळपासून सुरू झालेल्या संपामुळे प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असूनही, भरपावसात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पेटले आहे. एसटी कामगार संघटनेकडून आंदोलनाचे नेतृत्व केल्या जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पगारवाढ या प्रमुख मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन होत आहे.
काय आहे मागणी?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, पगार वाढ व्हावी अशी प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना राबविण्यात येत असून, त्याचे कौतुक आहे. मात्र अनेक वर्षांपासून महाराष्ट्राची जीवन वाहिनी ठरलेल्या लालपरीचे चालक वेतन वाढीपासून वंचित आहेत. मागील वर्षे देखील केलेले आंदोलन कर्मचाऱ्यांनी सांगितले आणि पुढील आंदोलनाची भूमिका आक्रमक होणार असल्याचा इशारा त्यांनी व्यक्त केला.