dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

प्रजासत्ताक दिनी आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

भोकरदन : शहरातील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा शासकीय नोकरी मिळविल्याबद्दल भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पंचायतराज समितीचे अध्यक्ष संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.

भोकरदन : शहरातील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा शासकीय नोकरी मिळविल्याबद्दल भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पंचायतराज समितीचे अध्यक्ष संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. शाळेतील माजी विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांत शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक वाढविल्याचे गौरवोद्गार संतोष दानवे यांनी बोलताना व्यक्त केले.

सोमवार, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शाळेत ध्वजवंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला, यावेळी आमदार दानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना आमदार दानवे यांनी विद्यार्थ्यांसोबत आस्थेवाईकपणे संवाद साधला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत साबळे, शाळेचे मुख्याध्यापक विकास वाघ, शिक्षक आत्माराम गाडेकर यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. 

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांत कार्यरत असलेले अतुल साळवे, शुभम मैंद, सौरभ दांडगे, करण कोल्हे या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top