आ. गायकवाडांकडून एकमेकांच्या पक्षात जाणीवपूर्वक ढवळाढवळ! आ. श्वेता महाले म्हणाल्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध…

बुलढाणा: चिखली विधानसभा मतदार संघातील  कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाल्यानंतर आपल्या भाषणातून बुलढाण्याचे  आमदार संजय गायकवाड यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपवर टीका केली.  ‘ मित्रपक्ष आहे म्हणून आतापर्यंत बोललो नाही, पण..’ असे म्हणत आ. गायकवाड यांनी भाजपला डीवचले होते. वृत्तवाहिन्यांवर या संदर्भातील क्लिप व्हायरल होत असताना चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

बुलढाणा: चिखली विधानसभा मतदार संघातील  कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाल्यानंतर आपल्या भाषणातून बुलढाण्याचे  आमदार संजय गायकवाड यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपवर टीका केली.  ‘ मित्रपक्ष आहे म्हणून आतापर्यंत बोललो नाही, पण..’ असे म्हणत आ. गायकवाड यांनी भाजपला डीवचले होते. वृत्तवाहिन्यांवर या संदर्भातील क्लिप व्हायरल होत असताना चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका वृत्तवाहिनी प्रतिनिधीशी बोलताना आ. संजय गायकवाड यांना उद्देशून त्या म्हणाल्या, “आपण एकदा लोकप्रतिनिधी बनलो की सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असते की आपण विकासावर राजकारण करावे. मात्र, आ. गायकवाड हे आखाड्याची भाषा करत आहेत. आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे आहोत, आपापल्या मतदारसंघात मित्र पक्षांना सोबत घेऊन काम करायचे असते. मात्र, जाणीवपूर्वक एकमेकांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करणे, हे काम आ. गायकवाडांकडून सुरू आहे. त्यांच्या विधानसभेत आम्ही आमचा पक्ष वाढवू,  आपण काम करत असताना मित्र पक्षां विषयी खालच्या शब्दात टीका करणे, हे चुकीचे आहे आम्ही याचा निषेधच करू, असे आ. श्वेता महाल्या म्हणाल्या. या प्रकरणावरून आता बुलढाणा जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत धुसफूस समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »