Maratha Mavla organization will rise to solve social problems: सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी मराठा मावळा संघटना पेटून उठणार – प्रा. माणिकराव शिंदे

Maratha Mavla organization will rise to solve social problems: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काम सुरूच आहे मात्र सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सुध्दा मराठा मावळा संघटना आगामी काळात पेटून उठणार आहे. त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांनी केले. 

छत्रपती संभाजीनगर:  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काम सुरूच आहे मात्र सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सुध्दा मराठा मावळा संघटना आगामी काळात पेटून उठणार आहे. त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांनी केले. 

मराठा मावळा संघटनेची शनिवारी दि. ३० नोहेंबर रोजी प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली येथे मोठ्या उत्साहात बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली, तसेच नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली. प्रा. शिंदे यांनी यावेळी आगामी काळात संघटनेची ध्येय धोरणे महाराष्ट्रभर नेण्याचे काम सर्व पदाधिकारी यांनी करावे व संघटना वाढी साठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. मराठवाडा अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे, शहर जिल्हाध्यक्ष भरत कदम,  महिला शहराध्यक्षा सुनिता पाटील, मराठवाडा उपाध्यक्ष बाळासाहेब भूमे, मराठवाडा संघटक संजय गायके, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज मुरदारे, महिला जिल्हाध्यक्षा रंजनाताई कोलते, जिल्हा उपाध्यक्ष,संग्रामसिंग जगताप, पुरुषोत्तम झळके, ज्ञानेश्वर वाघ, विक्रम जिवरग, साहेबराव शिंदे, संतोष कुशेकर, दत्तात्रय घावटे, अशोक गायकवाड, ऋषिकेश साठे, धनंजय चिरेकर, आकाश पवार,  साईनाथ कानोळे, मारुती गायकवाड, विनोद नलावडे, राम बारबैले, विद्या मोहिते, राणी पवार आदींसह कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »