Manoj Jarange Patil : तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील हे 4 जूनपासून पुन्हा उपोषणास बसणार आहेत. मात्र, अतंरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना सोमवार 3 जून रोजी निवेदन देऊन मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीतील उपोषण व आंदोलन यास परवानगी नाकारावी अशी मागणी केली आहे.
अंबड (जि. जालना) : तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील हे 4 जूनपासून पुन्हा उपोषणास बसणार आहेत. मात्र, अतंरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना सोमवार 3 जून रोजी निवेदन देऊन मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीतील उपोषण व आंदोलन यास परवानगी नाकारावी अशी मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 29 ऑगस्ट 2023 पासून अंतरवाली सराटी येथे सुरु असणाऱ्या आंदोलनास आमच्या गावातील सर्व जाती- धर्माच्या समाजाचा संपूर्ण पाठिंबा होता. म्हणून आम्ही सर्व समाज आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा देत होतो. यासोबत सेवा देखील देत होतो. परंतु कालांतराने आंदोलनातील भाषण, चर्चा, विषय हे मन दुखावणारे व जातीभेद करणारे होऊ लागले. त्यामुळे मराठा सोडून इतर समाज हा आंदोलनापासून दूर झाला असून, आमच्या गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील प्रेमाचे, आनंदाच वातावरण हे भय, चिंता, द्वेष, तिरस्काराममध्ये परावर्तीत झालेले आहे. यातून गावातील वातावरण सुरक्षित नसून जातीय सलोखा ही बिघडला जात आहे. या जातीय तेढातून भांडणे होऊन कायदा व सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, अंतरवाली येथील उपोषणामुळे स्थळाजवळ मंदिरातील पूजापाठ व धार्मिक विधीला पण अडचणी येत आहेत. गर्दीमुळे गावातील स्त्रियाना मंदिरात येता येत नाही. उपोषणस्थळी सभा मंडपाचे काम मंजूर झाले असून ते ही काम सुरू करता येत नाही. यामुळे गावाच्या विकासकामात अडथळा निर्माण होत आहे. उपोषण स्थळासमोरील रस्ता हा गावातील मुख्य रस्ता आहे. गावातील शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे गावातील मुख्य रस्त्यावर महिला पुरुष वर्गास येण्या-जाण्यासाठी आंदोलनामुळे या रस्तावर गर्दी आसल्याने या अडचणीमुळे गावातील लोकांची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती निवेदनात नमूद आहे. या निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.