Maharashtra Lok Sabha Election 2024 Result : अकोल्यात पाचव्यांदा कमळ फुलले,अनुप धोत्रे ४० हजार मतांनी विजयी

अनुप धोत्रे (भाजपा)

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result :  सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये अकोला लोकसभा मतदार संघात पाचव्यांदा कमळ फुलल्याने भाजपाच्या गोटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. काँग्रेस आणि भाजपा यांच्यात झालेल्या चूरशीच्या लढतीत भाजपाचे अनुप धोत्रे ४० हजार १२ मतांनी विजय मिळवला.

अनुप धोत्रे (भाजपा)
अनुप धोत्रे (भाजपा)

अकोला ः सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये अकोला लोकसभा मतदार संघात पाचव्यांदा कमळ फुलल्याने भाजपाच्या गोटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. काँग्रेस आणि भाजपा यांच्यात झालेल्या चूरशीच्या लढतीत भाजपाचे अनुप धोत्रे ४० हजार १२ मतांनी विजय मिळवला. या निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार डॅा. अभय पाटील यांना ४ लाख १३ हजार८५४ मते, तर वंचितरेच एड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७४ हजार ८२३ मते मिळाले. सलग पाचव्यांदा भाजपाच्या विजयानंतर अकोला लोकसभा मतदार संघात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या प्रमाणात जल्लोष केला.

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होताच अकोला लोकसभा मतदार संघात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात चूरशीची लढीत पाहावयास मिलाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे उमेदवार डॅा. अभय पाटील यांनी मोठी आघाडी घेतली होती, तर भाजपाचे अनुप धोत्रे आणि वंचितचे एड. प्रकाश आंबेडकर पिछाडीवर होते. मात्र, १५ व्या फेरीनंतर चित्र बदलायला सुरुवात झाली अन् भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या बाजूने जनादेश दिसू लागला. सुरुवातीला तीन हजारांची आघाडी घेत पुढे आलेले धोत्रे २० व्या फेरीपर्यंत २१ हजार ३६६ मतांची मुसंडी घेतली. २५ व्या फेरीपर्यंत धोत्रे ३८ हजार २०२ मतांनी आघाडीवर होते. अंतिम टप्प्यात २८ व्या फेरीमध्ये ४० हजार १२ मतांची आघाडी घेत धोत्रे यांनी अकोल्यात पाचव्यांदा कमळ फुलवले.

वंचित पिछाडीवर

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवार ४ जून रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरूवात झाली. एकूण २८ फेऱ्यांच्या या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर पिछाडीवर राहिले. पहिल्या फेरीमध्ये एड. आंबेडकर यांना १२ हजार ४१९ मते मिळाले होते. सुमारे अडीच हजार मतांनी धोत्रे त्यांच्या पुढे होते. मात्र, १० व्या फेरीपर्यंत डॅा. अभय पाटील आणि अनुप धोत्रे यांच्या लढतीत एड. आंबेडकर पिछाडीवर दिसून आले. १० व्या फेरीत एड. आंबेडकर यांना १ लाख १७ हजार ४०३ मते होती. येथूनच एड. आंबेडकर यांचा पराभव निश्चित झाला. २० व्या फेरीत ते २ लोख २१ हजार २९८ मतांवर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »