dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बेंबळा शिवारात हरणाच्या पिल्लाला जीवनदान: सास कर्तव्य सेवक सुनीलभाऊ नागोलकर यांच्या सतर्कतेमुळे वन्य प्राण्याचे प्राण वाचले

कारंजा : तालुक्यातील बेंबळा शिवारात आज एक दुर्मिळ व हृदयस्पर्शी घटना घडली. शिवारामध्ये काही मोकाट कुत्र्यांनी एका हरणाच्या पिल्लाला घेरले व जखमी केले. यावेळी त्या मार्गाने जात असलेले सामाजिक कार्यकर्ते व सास कर्तव्य सेवक सुनीलभाऊ नागोलकर यांची नजर या प्रसंगावर पडली.

तेव्हा तात्काळ जागरूकता दाखवत त्यांनी कुत्र्यांना हाकलले व जखमी पिल्लाला सुरक्षित आपल्या ताब्यात घेतले. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून त्या बछड्याला सुरक्षीत आश्रय दिला. ही माहिती सर्वधर्म मित्र मंडळाचे अध्यक्ष श्याम सवाई यांना देण्यात आली.

यानंतर सास कंट्रोल रूम कार्यालयाच्या माध्यमातून वनविभागाचे गोलूभाऊ पुरोहित यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यात आली. वन विभागाच्या टीमने पुढील उपचारासाठी तातडीने मदतीचे नियोजन केले.

सध्या शेतात कामांची लगबग सुरू असतानाही उत्तमभाऊंच्या सतर्कतेमुळे एक वन्य प्राण्याचा जीव वाचवला गेला. शेतकरी, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वन्यजीव संरक्षणात भाग घ्यावा, याचे हे एक आदर्श उदाहरण ठरले आहे. सर्वधर्म मित्र मंडळाच्या वतीने सुनीलभाऊ नागोलकर यांचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top