dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

‘नार्को टेस्ट करून सत्य बाहेर येऊ द्या’ ; अमोल खुणेचा अर्ज न्यायालयात सादर करा :  मनोज जरांगे  यांची एसपींकडे मागणी

जालना :  माझ्या घातपाताच्या कथित कट प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुणे याने स्वतःहून नार्को टेस्ट करण्याची मागणी करणारा अर्ज दिला असल्याने, माझ्यासह धनंजय मुंडे, अमोल खुणे व अन्य संशयितांची एकत्रित नार्को टेस्ट करून “दूध का दूध, पाणी का पाणी” करावे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

   गुरुवार, 5 फेब्रुवारी रोजी दुपारी  या संदर्भात जरांगे यांनी पोलीस अधीक्षकांची प्रत्यक्ष भेट घेऊन अमोल खुणेचा नार्को टेस्टसाठीचा अर्ज तातडीने मंजूर करून तो न्यायालयात सादर करावा, अशी  भूमिका मांडली.

यावेळी बोलताना जरांगे यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, “अमोल खुणे हा काही धुतल्या तांदळाचा नाही. अमोल खुणेच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय मुंडेंनी माझ्या घातपाताचा कट रचला आहे,” असा गंभीर दावा त्यांनी केला.

आपल्या जीवाला धोका असल्याचे स्पष्ट करत असतानाच, “माझी सध्याची सुरक्षा व्यवस्था काढून घ्या,” अशी मागणीही त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. “माझा घातपात करायचा असेल तर परळीच्या    त्या  नेत्याला मोकळं मैदान पाहिजे, म्हणूनच माझी सुरक्षा काढून घेण्याची मागणी केली आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या “तू मला मारायला ये” या कॉल रेकॉर्डिंगवर प्रतिक्रिया देताना, नाव न घेता जरांगे यांनी धनंजय मुंडेंना थेट इशारा दिला.  क्षत्रिय मराठा काय असतो ते दाखवतो. तुझे बोटंही परत जाऊ देणार नाही,” अशी धमकी त्यांनी दिली. या कथित घातपात प्रकरणातील सर्व आरोपींचा जामीन रद्द करून सखोल पुनर्तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही जरांगे यांनी यावेळी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top