dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Jijabai birth anniversary : जिजाऊ जन्मोत्सव सोहळा, मातृतीर्थ गजबजले!

Jijabai birth anniversary :  राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या ४२८ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सिंदखेडराजा नगरी गजबजली आहे. राजे लखुजी राजे जाधव राजवाड्यात म्हणजेच जिजाऊ जन्मस्थळी सकाळी शासकीय महापूजा पार पडली.

Jijabai birth anniversary

बुलढाणा : राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या ४२८ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सिंदखेडराजा नगरी गजबजली आहे. राजे लखुजी राजे जाधव राजवाड्यात म्हणजेच जिजाऊ जन्मस्थळी सकाळी शासकीय महापूजा पार पडली. राजे लखुजी जाधव यांच्या वंशजांनी जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन केले. त्यानंतर सकाळपासूनच जिजाऊ प्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीसह जिल्हाभरातील राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांनी जिजाऊ जन्मस्थळी हजेरी लावली आहे. पारंपारिक वेशभूषा साकारून विद्यार्थ्यांनी आणि महिला वर्गांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. सायंकाळी जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघातर्फे देखील ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top