dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भारत जगासाठी आशेचा किरण; सर्वात मोठ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारत आज जागतिक स्थरावर जी आव्हान निर्माण झाली आहे, त्यावर समाधान शोधणारा आणि जगाला आशेचा किरण दाखवणार देश बनला आहे. भारताचा जीडीपी प्रचंड वाढला आहे, यावरून आपली अर्थव्यवस्था किती मजबूत झाली आहे, याचा अंदाज येतो. आपण ज्या गतीने पुढे जात आहोत, ते पहाता लवकरच आपण जगात तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

नवी दिल्ली : भारत आज जागतिक स्थरावर जी आव्हान निर्माण झाली आहे, त्यावर समाधान शोधणारा आणि जगाला आशेचा किरण दाखवणार देश बनला आहे. भारताचा जीडीपी प्रचंड वाढला आहे, यावरून आपली अर्थव्यवस्था किती मजबूत झाली आहे, याचा अंदाज येतो. आपण ज्या गतीने पुढे जात आहोत, ते पहाता लवकरच आपण जगात तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर भाषण केले. यावेळी बोलताना भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची विकासाच्या दिशेने कशापद्धतीने वाटचाल सुरू आहे? याबद्दल माहिती दिली. राष्ट्रपतीच्या अभिभाषणाचा उल्लेख करताना राष्ट्रपतींनी केलेल्या भाषणातून भारताच्या विकासाचा स्वर संसदेमध्ये घुमला, असे मोदी यांनी म्हटले. पुढे बोलताना ते म्हणाले की, देश कशापद्धतीने विकास करत आहे, पुढे चालला आहे, याची चर्चा राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये झाली. 21 व्या शतकाचे पहिले क्वार्टर पूर्ण झाले आहे. आता 21 व्या शतकातील दुसरे क्वार्टर देखील विकसीत भारताच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचे असणार आहे, असे यावेळी मोदी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या काळात कराराचा अर्थ फक्त घोटाळे

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या काळात जेव्हा जेव्हा कोणत्याही कराराची चर्चा व्हायची, तेव्हा लोकांच्या डोळ्यांसमोर फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळेच यायचे. त्यांच्यासाठी कराराचा अर्थ हा केवळ बोफोर्ससारखे व्यवहार असा होता. आजही लोक या पक्षांबद्दल बोलताना विकासाच्या मुद्द्यांऐवजी त्यांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांचीच आठवण काढतात, असा टोला मोदींनी लगावला.

विरोधकांचा गोंधळ आणि सभात्याग

पंतप्रधान बोलायला उभे राहिले तेव्हा विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. यादरम्यान मोदींनी मल्लिकार्जुन खर्गे यांना उद्देशून एक खोचक टिप्पणी केली.  खर्गे यांचे वय 83 वर्ष असल्याने त्यांनी बसूनच घोषणाबाजी करावी, असा चिमटा मोदींनी काढला. या गदारोळानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. विरोधक बाहेर गेल्यानंतर मोदी म्हणाले की, ते थकले असून आता मैदानातून पळून गेले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top