गुणरत्न सदावर्ते यांची जाहीर गर्जना… “डंके की चोट पे धनगर एसटी हैं”

जालना :  सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या बेंचने दिलेल्या निकालात म्हटले आहे की, शेड्युल्ड ट्राइबमध्ये समाविष्ट असलेल्या जातींना मागासलेपण सिद्ध करण्याची गरज नाही. त्यामुळे मी डंके की चोट पे सांगतो की, धनगर समाज एसटी आहे, अशी ठाम भूमिका  प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी येथे मांडली. 

जालना :  सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या बेंचने दिलेल्या निकालात म्हटले आहे की, शेड्युल्ड ट्राइबमध्ये समाविष्ट असलेल्या जातींना मागासलेपण सिद्ध करण्याची गरज नाही. त्यामुळे मी डंके की चोट पे सांगतो की, धनगर समाज एसटी आहे, अशी ठाम भूमिका  प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी येथे मांडली. 

      धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जालना येथे दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी रविवार, 21 सप्टेंबर रोजी गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सदावर्तेंनी ठाम कायदेशीर मुद्द्यांसह भावनिक भाषण केले.

  ते म्हणाले, ‘ माझी 80 वर्षांची आई म्हणाली की सरकार अजून भेटायला आलेले नाही. निदान तू तरी मला घेऊन चल. म्हणून ती खास मुंबईहून उपोषणस्थळी आली आहे.’ या भावनिक प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. सदावर्तेंनी ठामपणे सांगितले की, धनगर समाजाला मागासलेपण सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. सरकारने केवळ एसटीचे जातप्रमाणपत्र द्यावे. ज्या दिवशी सरकार हे प्रमाणपत्र देईल, त्या दिवशी मी स्वतः येथे येईन, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. यावेळी मोठया संख्येने धनगर समाज आंदोलनस्थळी जमलेला होता. सदावर्तेंनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलनांना उत्साहित केले. 

 कायदेशीर मुद्दे मांडले

उपस्थित धनगर समाजातील नागरिकांना उद्देशून सदावर्ते म्हणाले, आम्ही धनगर आहोत, हे विसरू नका. इंग्रजांच्या काळात आदिवासी समाजाला क्रिमिनल ट्राईब म्हटले गेले. त्यात धनगरांचा समावेश होता. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे, की शेड्यूल्ड कास्ट किंवा ट्राईब समाजांना मागासलेपण सिद्ध करण्याची गरज नसते. त्यामुळे या कायदेशीर मुद्यांना तुम्ही लक्षात ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. 

 जीआर नव्हे ऍक्ट घेऊन या..

सदावर्तेंनी सरकारला स्पष्ट शब्दांत आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, संजय सिरसाट यांनी उपोषण सोडवताना फक्त जीआर न आणता थेट अ‍ॅक्ट घेऊन यावे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसे गांधीजींना वाचवलं होतं, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी दीपक बोराडेंना वाचवावं, असे आवाहन देखील त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »