dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

हर्सूल तलावात बुडाल्याने चौघांचा मृत्यू; मृतात तीन मित्रांचा समावेश | Harsul lake

Harsul lake : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात बुडाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवार, 5 एप्रिल रोजी घडली. यामध्ये हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांसह एका अनोळखी व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती मनपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर :  शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात बुडाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवार, 5 एप्रिल रोजी घडली. यामध्ये हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांसह एका अनोळखी व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती मनपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी सांगितले. मृतापैकी दोघांची औळख पटली असून दोघांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफान खान इस्माईल खान (17 वर्ष), शेख आदिल शेख मोहसीन (15 वर्ष) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. हर्सूल तलाव परिसरातील जांभूळवन जवळील पाण्यात तीन मुले बुडाल्याची माहिती अग्निशमन दलाला रविवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास मिळाली. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, ड्युटी अधिकारी वैभव बाकडे, लक्ष्मण कोल्हे, अग्निशामक जवान अशोक पोटे, विक्रम भुईगळ, शिवाजी काकडे, गजानन गावंडे, संग्राम मोरे, विजय कोथमीरे, सचिन शिंदे, गोपीचंद मोरे, महेंद्र खोतकर, शेख समीर, मोहम्मद दुशाज आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top