dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक नोंदणी शुल्क विभागात आग; फर्निचरसह महत्वाचे दस्ताऐवज जळून खाक

छत्रपती संभाजीनगर :  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या नोंदणी व मुद्रांक नोंदणी शुल्क विभागात आग लागून फर्निचरसह महत्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाले. ही घटना शनिवार, 10 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. पद्मपुरा व सिडको अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून आगीवर नियंत्रण मिळवले असल्याची माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नोंदणी व मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाचे कार्यालय आहे. शनिवारी सकाळी नोंदणी व मुद्रांक नोंदणी विभागातून धूर निघत असल्याचा प्रकार सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या घटनेची माहिती मनपा अग्निशमन दलाला आणि पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, उपअग्निशमन अधिकारी विनायक कदम, डयुटी अधिकारी पवार, कुलकर्णी, एच.वाय. घुगे, अग्निशमन दलाचे जवान सुरज राठोड, अशोक पोटे, काकडे, रामदास दुधे, बाळू आहेर, राजेंद्र बावस्कर, दिनेश मुंगसे, मतीन, बमके, त्र्यंबक सावंत, समीर शेख, किशोर कोळी, आल्हाट आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून अवघ्या तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत कार्यालयातील फर्निचर, संगणक, विद्युत पंखे, ट्युबलाईट आदी साहित्यासह महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. नोंदणी व मुद्रांक शुल्क नोंदणी विभागात ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेची नोंद सिटीचौक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top