Accident on Samrudhi Highway : समृध्दी महामार्गावर पांगरी शिवारात भीषण आपघात; वाहन चालक जागीच ठार

Accident on Samrudhi Highway

Accident on Samrudhi Highway : समृध्दी महामार्गावर समोरच्या वाहनाला धडकून झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार 22 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

Accident on Samrudhi Highway
Accident on Samrudhi Highway

Accident on Samrudhi Highway जालनासमृध्दी महामार्गावर समोरच्या वाहनाला धडकून झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार 22 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
मालवाहू वाहन (क्र.एमएच-15-एचएच- 8434) चा चालक उमेश भीमराव बनसोड (रा. शिवाजीनगर, नाशिक) हे नाशिक ते अमरावती जात असतांना समृध्दी महामार्ग नागपूर कॉरीडॉर चॅनल क्रमांक 374 नजीक पांगरी शिवारात गुरूवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास वाहनावरील ताबा सुटल्याने समोर चाललेल्या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकले. यामध्ये वाहन चालक उमेश भीमराव बनसोड जागीच ठार झाले. अशी माहिती रुग्णवाहिकेमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक आर. के. निकम, पो.काँ. ठोंबरे, परसुवाले, निखिल बोडखे, लहू जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पोलिसांनी वाहन चालकास तत्काळ समृद्धी रुग्णवाहिकेमध्ये टाकून सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवून अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये ड्रॅगन फूड, आलु बुखारा हे फळे असून, अपघातग्रस्त वाहन समृद्धी हायड्राच्या साह्याने ॲडमिन बिल्डिंग येथे आणून उभे केले आहे. तसेच मयताच्या नातेवाईकांना फोन करून माहिती देण्यात आली. महामार्ग पोलिसांनी बदनापूर पोलीस ठाणे व कंट्रोल रूम यांना अपघाताची माहिती दिली असून, महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »