श्रीनगर : या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताची ही कारवाई होती.

भारताने हा हल्ला पंजाब प्रांत आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी संपूर्ण प्रांतात आणीबाणी जाहीर केली आहे. सरकारी निवेदनानुसार, बुधवारसाठी सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. पंजाब पोलिसांसह सर्व सुरक्षा एजन्सींना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासकीय युनिट्सना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्यांना तात्काळ कामावर परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.