dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सोलापूर येथे कारखान्यात लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू 

सोलापूर : जिल्ह्यातील एका कारखान्यात रविवारी लागलेल्या भीषण आगीत तीन महिला आणि एका मुलासह आठ जणांचा मृत्यू झाला. 

सोलापूर : जिल्ह्यातील एका कारखान्यात रविवारी लागलेल्या भीषण आगीत तीन महिला आणि एका मुलासह आठ जणांचा मृत्यू झाला. 

सोलापूर एमआयडीसीमधील अक्कलकोट रोडवरील सेंट्रल टेक्सटाईल मिल्समध्ये पहाटे ३:४५ वाजता लागलेल्या आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. घटनास्थळ मुंबईपासून अंदाजे ४०० किलोमीटर अंतरावर आहे. मृतांमध्ये कारखान्याचे मालक हाजी उस्मान हसनभाई मन्सूरी, त्यांच्या दीड वर्षाच्या नातवासह कुटुंबातील तीन सदस्य आणि चार कामगारांचा समावेश आहे. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक तास लागले. घटनास्थळी अग्निशमन कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top