dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

लेहणी-धोडप मार्गावर आयशर आणि बसची भीषण धडक; दोन्ही चालक गंभीर | Eicher and bus accident

Eicher and bus accident : रिसोड  तालुक्यातील लेहणी-धोडप मार्गावर मंगळवारी सकाळी आयशर ट्रक आणि बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत. 

रिसोड :  तालुक्यातील लेहणी-धोडप मार्गावर मंगळवारी सकाळी आयशर ट्रक आणि बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने, बसमधील प्रवासी मोठ्या अनर्थातून थोडक्यात बचावले असून काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी लेहणी ते धोडप या मार्गावरून बस जात असताना समोरून येणाऱ्या आयशर ट्रकशी तिची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला फेकली गेली. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

​प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, लेहणी-धोडप हा मार्ग अत्यंत अरुंद आहे. दोन्ही वाहने समोरासमोर आल्यावर त्यांना बाजू घेण्यास जागा नसल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या मार्गावरील वाढत्या रहदारीमुळे आणि अरुंद रस्त्यामुळे येथे वारंवार छोटे-मोठे अपघात होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढून तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधील किरकोळ जखमी प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top