देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला:  कार उभ्या ट्रकवर आदळली, तिघे ठार चार जण गंभीर जखमी 

नांदुरा :  देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली असून रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर भाविकांची कार धडकल्याने या अपघातामध्ये कारमधील तिघे जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर स्वरूपाने जखमी झाल्याची घटना नांदुरा- मलकापूर  महामार्गावरील खातखेड फाट्याजवळ 12 मे रोजी मध्यरात्री दोन वाजे दरम्यान उघडकीस आली.

          याबाबत यवतमाळ जिल्ह्यातील आर्मी तालुक्यातील रहिवाशी राठोड व पवार कुटुंब देवदर्शनाकरिता कार क्रमांक एमएच 26 सीई 6245 ने निघाले होते. दरम्यान विविध ठिकाणी देवदर्शन आटोपून 12 मे रोजी पुन्हा परतीच्या मार्गावर असताना मध्यरात्री 2 वाजे दरम्यान मलकापूर नांदुरा महामार्गावरील खातखेड फाट्याजवळ रस्त्याच्या मधोमध प्रक्र क्रमांक एमपी 09 डीएम 1362 उभा होता. सदर ट्रक इंडिकेटर न लावताच अंधारात उभा असल्याने सदर भाविकांची कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये कारमधील देवराव गंगाराम पवार (60), बबीता देवराव पवार (55), निकेतन देवराव पवार (26) सर्व रा. लोकरवाडी तालुका माहूर जिल्हा नांदेड यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कार मधील मोनिका देवराव पवार, भूमिका रामराव पवार, प्रियंका देवराव पवार, हितांशी जीवन राठोड व कारचालक संतोष भगवान कदम हे गंभीर स्वरूपाने जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशन चे कार्यकर्ते रुग्णवाहिका सह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांच्या मदतीने कार मधील जखमींना तातडीने बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात रेफर करण्यात आले. तसेच  मृतकांचे शव नांदुरा रुग्णालयामधील शवगृहात ठेवण्यात आले. याप्रकरणी निलेश आदुसिंग राठोड (42) यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी उपरोक्त ट्रक क्रमांकाच्या चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »