परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन बुधवार, 31 जानेवारी रोजी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करुन न्याय मागण्या त्वरित सोडविण्याची मागणी केली.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर हे विविध पदावर 2008 सालपासून कार्यरत आहेत. त्यांना तुटपुंजे मानधन मिळत असताना देखील त्यांनी शासनाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण करीत आहेत. परंतु शासनाच्या काही चुकीच्या धोरणामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत आहे. किमान दहा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवून द्यावे तसेच इतर शासकीय भत्यांचा लाभ द्यावा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत जॉब संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुदाम आवरगंड, श्रीकांत देशमुख, सय्यद परवेज, भगवान कदम, सय्यद उमेर, शिवाजी दूधवडे, माणिकराव भुजबळ, समीर काळे, शिवप्रसाद दुधाटे, भागवत अंभोरे, शेख फयाज, जितेंद्र देशपांडे, श्रीरंग घाडगे, एस आर सनपूरकर, सचिन कड तन, भागवत अंभुरे,राजू जाधव, अनिल तिगोटे, रामेश्वर मुंणेशावर, सुमित माले, कांबळे सुधाकर, शिंदे, तातेराव,वाटोरे आर एल, मोहम्मद अकबर, पी बी जाधव, जी एन ठेहरे, टी एल राठोड, एस जी सोरेकर, एस एन वाकळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.