पाचपीरवाडी : जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाजसेवी संस्था असे तब्बल 2 हजार लोक झाडू घेऊन वेरुळच्या रस्त्यांवर उतरले आणि वेरुळ चकाचक झाले. श्री क्षेत्र घ्रुष्णेश्वर मंदीर परिसर, येळगंगा नदी, मालोजीराजे भोसले गढी परिसर, अरिहंत चौक. लेणी परिसर तसेच गावातील महत्त्वाची मैदाने आदी परिसरात ही स्वच्छता मोहिम शुक्रवार, 13 फेब्रुवारी रोजी राबविण्यात आली. यावेळी स्वच्छता हीच ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले तर स्वच्छता ही निरंतर बाब असून त्यात सातत्य राखणे गरजेचे आहे, असे मत आ. प्रशांत बंब यांनी व्यक्त केले.

वेरुळ येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यापार्श्वभुमिवर शुक्रवारी वेरुळ येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी आ. प्रशांत बंब, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, विविध समाजसेवी संस्थांचे पथके आदी उपस्थित होते. वेरुळ गावातील वेरुळ लेणी ते अरिहंत चौक, कैलास हॉटेल ते येळगंगा नदी, येळगंगा नदी ते तलाठी ऑफिस, मालोजीराजे भोसले गढी, तीर्थकुंड ते भोसले चौक, भोसले चौक ते कसाबखेडा रोड आदी परिसरात बाजार तळ, कब्रस्थान, एमटीडीसी पार्कींग, महादेव उद्यान, दर्गा दावल मलिक, भीमनगर परिसर आदी भागात अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, स्थानिक गावकरी आदींनी श्रमदान करुन स्वच्छता केली.