तुरीच्या शेतात गांजाची लागवड ; 3.85 लाखांचा मुद्देमाल जप्त 

देऊळगाव राजा : बुलढाणा जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी कारवाईत मोठे यश मिळाले असून, तुरीच्या पिकाआड गांजाची बेकायदा लागवड करणारा शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा व खामगाव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 15 डिसेंबर रोजी मेव्हणा राजा शिवारातील गट क्रमांक 319 मध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी विष्णू सुखदेव बोरुडे (वय 39, रा. मेव्हणा राजा, ता. देऊळगाव राजा) याच्या मालकीच्या शेतात तुरीच्या पिकामध्ये ठिकठिकाणी गांजाची बेकायदा लागवड करून त्याचे संगोपन करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. छाप्यात पोलिसांनी 28 किलो 51 ग्रॅम वजनाची ओलसर गांजाची झाडे (किंमत अंदाजे 2 लाख 85 हजार 100 रुपये) तसेच 4 किलो 700 ग्रॅम वजनाची सुकलेली गांजाची झाडे (किंमत अंदाजे 94 हजार रुपये) असा एकूण 3 लाख 85 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्या नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »