Buldhana Vidhan Sabha Elections: बुलढाणा जिल्ह्यात दुरंगी लढतीचे वारे!

Buldhana Vidhan Sabha Elections

Buldhana Vidhan Sabha Elections:  जिल्ह्यात सात मतदारसंघात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यापैकी सिंदखेडराजा मतदारसंघ सस्पेन्स वाढत असताना इतर सर्व ठिकाणच्या लढती आता स्पष्ट झाल्या आहेत. जिल्ह्यातील या लढतीमध्ये दुरंगी वारे दिसून येत आहेत.

Buldhana Vidhan Sabha Elections

ब्रम्हानंद जाधव/ बुलढाणा : जिल्ह्यात सात मतदारसंघात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यापैकी सिंदखेडराजा मतदारसंघ सस्पेन्स वाढत असताना इतर सर्व ठिकाणच्या लढती आता स्पष्ट झाल्या आहेत. जिल्ह्यातील या लढतीमध्ये दुरंगी वारे दिसून येत आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस राहिले असल्याने उमेदवारांची धावपळ वाढली आहे. प्रत्येक उमेदवाराकडून शक्तीप्रदर्शनावर जोर दिला जात आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सात मतदारसंघात उमेदवार कितीही असले तरी लढत दुरंगीच होत आहे. नेहमीप्रमाणे उमेदवारी जाहीर झाल्यापासून नाराजीचा सूर प्रत्येक मतदारसंघात ओसंडून वाहत आहे. मात्र या नाराजीला थोपविण्यासाठी पक्षश्रेष्टींकडून चांगलेच प्रयत्न सुरू आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संयज गायकवाड यांच्या विरुध्द शिवसेना उबाठाने जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली आहे. ही लढत आमदार गायकवाड यांच्यासाठी जेवढी प्रतीष्ठेची आहे, तेवढीच जयश्री शेळके यांच्यासाठी राजकीय करिअरचा टर्निंग पॉईंट ठरणारी निवडणूक आहे. चिखली मतदारसंघावर तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

चिखलीत भाजपच्या श्वेता महाले विरुध्द काँग्रेसचे राहूल बोंद्रे यांच्यात ‘काटे की टक्कर’ आहे. सोबतच मनसेने गणेश बरबडे यांनाही मैदानात उतरवले आहे. मेहकरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे डॉ.संजय रामयुलकर हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात असून, त्यांच्या विरोधात उध्दवसेनेने सिध्दार्थ खरात नवा चेहरा दिला आहे. वंचितच्या ऋतुजा चव्हाणही निवडणूक रिंगणात आहेत. सिंदखेडराजामधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डॉ.राजेंद्र शिंगणे पुन्हा एकदा मैदानात उतरले असून, वंचितने सविता मुंढे यांना उमेदवारी दिली आहे. शशिकांत खेडेकर यांच्या अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून सुरू असलेल्या हालचाली समीकरण बदलू शकतात. जिल्ह्यात मतदारसंघातील दोन जागांवर उध्दव सेना विरुध्द शिंदे सेना आणि इतर दोन जागांवर भाजप विरुध्द काँग्रेस अशीच लढत आहे.

घाटाखालील मतदारसंघात गड राखण्याचे आव्हान

खामगाव मतदारसंघातून भाजपने ॲड.आकश फुंडकर यांना उमेदवार दिली आहे. येथे भाजपविरुध्द काँग्रेस अशीच लढत राहणार आहे. काँग्रेसने दिलीप सानंद यांना उमेदवारी दिली असून सानंदा यांच्यासाठी ही लढाई अस्तित्वाची आहे. जळगाव जामोदमधून भाजपचे संजय कुटे विरुध्द काँग्रेसच्या स्वातीताई वाकेकर यांच्यात लढत आहे. याठिकाणी संजय कुटे यांना आपला गड राखण्याचे आव्हान आहे. मलकापूर मतदासंघात काँग्रेसने राजेश एकडे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून संचेती यांची दावेदारी आहे. मात्र या मतदारसंघातील चित्र अद्याप अस्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »