dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

एक कोटी रुपयाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचा निर्घृन खून; सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील घटना

सिल्लोड :  तालुक्यातील बोदवड येथील एका व्यापाऱ्यांचे अपहरण करून एक कोटी रुपयांच्या खंडणी मागणी करणाऱ्या आरोपींनी त्यांची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह चाळीसगाव घाटात फेकुन दिला. ही धक्कादायक घटना सोमवार, 29 डिसेंबर रोजी उघडकीस आल्यानंतर सिल्लोड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तुकाराम माधवराव गव्हाणे (५५ वर्ष), रा. बोदवड, ता. सिल्लोड असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बोदवड येथील किराणा व भुसार मालाचे व्यापारी तुकाराम गव्हाणे हे शनिवार, २७ डिसेंबर रोजी उंडणगाव येथे आले होते. पंरतु रात्री उशिरा घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांची विचारपुस करुन शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा कुठे ही शोध लागला नाही, रविवारी सकाळी मयत तुकाराम गव्हाणे यांच्या मोबाईल वरून आरोपींनी मयताच्या मुलास एक कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. त्यानंतर गव्हाणे यांच्या कुटुंबियांनी अजिंठा पोलिस ठाण्यात तुकाराम गव्हाणे यांचे अपहरण झाले असून अपहरणकर्त्यांनी एक कोटी रुपये खंडणी मागीतल्याची तक्रार दिली. अजिंठा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाची माहिती स्थानिक गुन्हेशाखेला दिली. अजिंठा पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून शोध घेतला असता, सोमवारी तुकाराम गव्हाणे यांचा मृतदेह चाळीसगाव घाटात मिळून आला. प्राथमिक माहितीनुसार, तुकाराम गव्हाणे यांचे अपहरण केल्यानंतर खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून पाच संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती स्थानिक गुन्हेशाखेच्या सूत्रांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top