dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गुलालाची उधळण करीत भाजपचा जल्लोष

सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील फर्दापूर जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार माहीन इद्रिस मुलतानी, सावळदबारा पंचायत समिती गणातून विजयी झालेले उमेदवार गणेश चव्हाण तसेच फर्दापूर गणाचे उमदेवार राहुल राठोड विजयी झाल्याबद्ल भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुलालाची उधळण करीत सावळदबारा येथे नुकताच जल्लोष करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी केली.

फर्दापूर जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या माहिन इद्रिस मुलतानी ह्या भाजप अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या कन्या आहेत. माहिन इद्रिस मुलतानी, सावळदबारा गणाचे उमेदवार गणेश चव्हाण, फर्दापूर गणाचे उमेदवार राहुल राठोड यांच्या विजयानंतर सावळदबारा येथे भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून तसेच गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते, गजानन दांडगे, रामचंद्र चिमणकर, रमेश सपाटे, एकनाथ सपाटे, ताराचंद जाधव, संदीप कपाटे आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top