dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अनुराग कश्यपने एपस्टीन फाइल्सबद्दल सोडले मौन 

मुंबई : एप्सटीन फाइल्समध्ये नाव आल्याच्या चर्चेवर चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने मौन सोडले आहे. कश्यपने सांगितले की, त्याचा एप्सटीन फाइल्स किंवा जेफ्री एप्सटीनच्या कोणत्याही गतिविधीशी कोणताही संबंध नाही. एका वृत्तानुसार, अनुराग कश्यपचे नाव एप्सटीन फाइल्समध्ये “बॉलिवूड गाय” म्हणून आले आहे.

मुंबई : एप्सटीन फाइल्समध्ये नाव आल्याच्या चर्चेवर चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने मौन सोडले आहे. कश्यपने सांगितले की, त्याचा एप्सटीन फाइल्स किंवा जेफ्री एप्सटीनच्या कोणत्याही गतिविधीशी कोणताही संबंध नाही. एका वृत्तानुसार, अनुराग कश्यपचे नाव एप्सटीन फाइल्समध्ये “बॉलिवूड गाय” म्हणून आले आहे. त्याचे नाव फक्त एका ठिकाणी “प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक” म्हणून घेतले गेले आहे. यात संगणक शास्त्रज्ञ बेन गोएर्टझेल, संशोधक ब्रूस डेमर आणि डीजे स्पूकी यांसारख्या लोकांचाही उल्लेख आहे.

शांघायमध्ये नियोजित एका कार्यक्रमासाठी कश्यपला संभाव्य पाहुणा म्हणून सूचीबद्ध केले होते, ज्यात बौद्ध धर्म, तंत्रज्ञान आणि उपचार यावर कार्यशाळा होणार होत्या. ही माहिती एपस्टीन, मानसोपचारतज्ज्ञ ग्यूसेप बर्सानी आणि शिक्षणतज्ज्ञ गीनो यू आणि ओर्नेला कोराजा यांच्यातील ईमेल्समध्ये मिळते. तथापि, कश्यप कधी अशा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झाला होता, याचा कोणताही पुरावा नाही.

तरीही, एका मुलाखतीत बोलतांना अनुराग कश्यपने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. तो म्हणाला, “मला याबद्दल काहीही माहिती नाही. मला दर महिन्याला सुमारे १५ निमंत्रणे वक्ता म्हणून मिळतात. मी बहुतेकांना उत्तर देत नाही. मी कधीही बीजिंगला गेलोच नाहीये.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top