दुसर्‍या चार वर्षाच्या मुलीवरही लैंगिक अत्याचार केल्याचे उघड:  प्रशांत वाडेकर याच्याविरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल

जालना : प्रेयसीच्या सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या त्या प्रियकराने प्रेयसीच्या दुसर्‍या चार वर्षाच्या बालिकेवर देखील लैंगिक अत्याचार केल्याचे मंगळवार, 8 एप्रिल रोजी समोर आले आहे.  

जालना : प्रेयसीच्या सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या त्या प्रियकराने प्रेयसीच्या दुसर्‍या चार वर्षाच्या बालिकेवर देखील लैंगिक अत्याचार केल्याचे मंगळवार, 8 एप्रिल रोजी समोर आले आहे.  

   अनैसर्गिक कृत्ये केल्याप्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेल्या प्रशांत प्रकाश वाडेकर याचा आणखी एक संतापजनक कारनामा उघडकीस आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.  पीडित मुलीच्या चार वर्षाच्या लहान बहिणीवरदेखील लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाल्याने मंगळवारी पुन्हा त्याच्यावर प्रेयसीने दिलेल्या फिर्यादीवरून आणखी एक गुन्हा कदीम जालना पोलिसांनी दाखल केला.

 पतीपासून विभक्त असलेली जिंतूर तालुक्यातील 28 वर्षीय महिला आपल्या 6 आणि 4 वर्षीय दोन मुलीसह तिचा प्रियकर प्रशांत प्रकाश वाडेकर यांच्यासोबत जुन्या जालन्यात एका वाड्यात किरायाच्या खोलीत राहत होती.

प्रेयसीच्या सहा वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि अनैसर्गिक कृत्ये केल्याप्रकरणी प्रशांत प्रकाश वाडेकर याच्याविरुद्ध कदीम जालना पोलिसांनी रविवार, 6 एप्रिल रोजी लैंगिक अत्याचार आणि पोस्को कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे.

 गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचदिवशी रात्री प्रशांत वाडेकर यास कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, किशोर वनवे यांनी ताब्यात घेऊन अटक केली होती.

अटकेत असलेल्या प्रशांत वाडेकर याची न्यायालयाने 10 एप्रिल पर्यंतच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

दरम्यान, कोठडीतील चौकशीदरम्यान नराधम प्रशांत वाडेकर याने प्रेयसी घरी नसतांना अत्याचार पीडित 6 वर्षीय मुलीला घराबाहेर तिच्या 4 वर्षीय लहान मुलीवर देखील लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. त्यामुळे पुन्हा पीडित मुलींच्या आईच्या फिर्यादीवरून प्रशांत प्रकाश वाडेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 64 ( 2) (एफ), 65 (2) आणि पोक्सो कायद्याच्या 4,6,8 कलमान्वये कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंक मोबाईल पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »