Akola vote counting: अकोला विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेस उमेदवार साजिद खान पठान यांनी २५ हजार ४१९ मतांची आघाडी घेतली, तर भाजपाचे विजय अग्रवाल १४ हजार ७६५ मतांनी दुसऱ्या स्थानावर आहेत.
अकोला : अकोला विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेस उमेदवार साजिद खान पठान यांनी २५ हजार ४१९ मतांची आघाडी घेतली, तर भाजपाचे विजय अग्रवाल १४ हजार ७६५ मतांनी दुसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे अकोला पूर्वमध्ये ९ व्या फेरीत भाजपाचे रणधिर सावरकर यांनी ३१ हजार ९१३ मतांची आघाडी घेतली आहे.
अकोला पूर्व मतदारसंघातील मतमोजणीच्या ९ व्या फेरीमध्ये भाजपाचे उमदेवार रणधिर सावरकर यांनी ३१ हजार ९१३ मतांनी आघाडी मिळवली आहे. तर दुसऱ्या स्थानावर शिवसेनेचे (ठाकरे गट) गोपाल दातकर यांना २६ हजार ८३७ मत मिळाली आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघात पाचव्या फेरीपर्यंत भाजपाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. पाचव्या फेरीच्या आकड्यांनुसार काँग्रेसचे साजिद खान पठान यांनी २५ हजार ४१९ मतांची आघाडी, तर भाजपाचे विजय अग्रवाल यांना १४ हजार ७६५ मते मिळाली आहेत. हरिष आलिमचंदानी यांना २ हजार ९६० मते मिळाली आहेत. साजिद खान पठान १० हजार मतांनी पुढे आहेत. मूर्तिजापूर मतदारसंघात तिसऱ्या फेरीपर्यंत भाजपचे उमेदवार हरिष पिंपळे हे ८ हजार ३४६ मतांनी आघाडीवर आहेत.