जालना : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आदित्य ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली होतील आणि 2029 मध्ये तेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास उबाठाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी येथे व्यक्त केला.

एका विवाह सोहळ्यानिमित्त चंद्रकांत खैरे सोमवार,7 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता जालना शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 2029 साली भाजपचे अधःपतन होऊन शिवसेना सत्तेत येणार असल्याचा दावा केला.
दानवेनी मला पाडलं, देवाने त्यांना पराभूत केले!
लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंनी सिग्मा हॉस्पिटलमध्ये बसून माझा निवडणुकीत पराभव केला, असा आरोप देखील खैरे यांनी केला. आमच्याच नगरसेवक आणि नेत्याला पैसे देऊन दानवेंनी मला पराभूत केले .त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत दानवेंना देवाने जालन्यात पराभूत केले,असा टोला खैरे यांनी रावसाहेब दानवे यांना हाणला. मैदान पुढे आहे. आम्ही पुन्हा परत येणार, असा ईशारा देखील खैरे यांनी भाजपला दिला.