वाहनातून पडल्यामुळे वारकऱ्यावर काळाचा घाला: खामगाव-शेगाव मार्गावरील लासुरा फाट्यावरील घटना

खामगाव : शेगाव मार्गावरील लासुरा परिसरात आज शनिवारी पहाटे घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात वारकरी संप्रदायातील एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. धार्मिक भावनेतून निघालेला प्रवास क्षणातच काळाच्या घाल्यात सापडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

शनिवारी (दि. 7 फेब्रुवारी) पहाटे सुमारे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, जनार्दन दगडू गाडेकर (65) रा. सावळा, ता. व जि. बुलडाणा हे वारकरी एका दिंडीत सहभागी होऊन प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान ते ट्रॅक्टरमध्ये बसून जात असताना अचानक तोल जाऊन वाहनातून खाली रस्त्यावर पडले. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, गाडेकर हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे दिंडीतील वारकरी तसेच नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली. नातेवाईकांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »