वृद्ध  सासूला मारहाण; सुनेला तीन महिने कारावास

बुलढाणा :  कौटुंबिक वादातून  सासूला आणि पतीला गंभीर मारहाण करणाऱ्या एका सुनेला बुलढाणा  न्यायालयाने दोषी ठरवत गुरूवारी १५ जानेवारी रोजी तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

बुलढाणा :  कौटुंबिक वादातून  सासूला आणि पतीला गंभीर मारहाण करणाऱ्या एका सुनेला बुलढाणा  न्यायालयाने दोषी ठरवत गुरूवारी १५ जानेवारी रोजी तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

बुलढाणा शहरातील समर्थ नगर भागात आपल्या मुलासोबत वास्तव्यास असलेल्या कमल श्रीराम राठोड (वय 79 वर्षे) यांचे २४ ऑगस्ट २०२३ रोजी घरात आपल्या सुनेसोबत  कौटुंबिक वाद झाले होते. या वादातून त्यांची सून मिनल पंकज राठोड (वय ३२ वर्षे) हिने रागाच्या भरात आपल्या सासूला धक्का देऊन गंभीर दुखापत केली होती. मुलगा पंकज आपल्या आईला सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेला असता, आरोपी मिनल हिने त्यालाही मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कमल राठोड यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून आरोपी मीनल हिच्या विरुद्ध  गुन्हा दाखल केला होता. पोलीस अंमलदार नामदेव खवले यांनी उपरोक्त गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. बुलढाणा येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचे समोर सदर खटला चालवण्यात आला. न्यायाधीश पंकज देशपांडे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. सरकारी वकिलांनी एकूण ६ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून आरोपी मिनल राठोड हिच्यावरील दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने तिला तीन महिने साधा कारावास, एकूण ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या बाजूने सरकारी अभियोक्ता ॲड.वैशाली कस्तुरे, स्वाती जयस्वाल आणि सचिन देशमुख यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »