भाजपची अनपेक्षित माघार; उद्धवसेनेचा उपाध्यक्ष बिनविरोध : वाशिम नगरपरिषदेत ‘सॉफ्ट पॉलिटिक्स’चा प्रयोग

वाशिम : नगरपरिषदेत मंगळवारी जे घडले, ते रणसंग्रामापेक्षा पडद्यामागील राजकीय तडजोडीचे ठळक उदाहरण ठरले. भाजपचे सर्वाधिक १४ नगरसेवक निवडून आले असतानाही उपाध्यक्षपदासाठी उमेदवार न देता माघार घेतल्याने उद्धवसेनेचे रवि भांदुर्गे हे बिनविरोध उपाध्यक्षपदी निवडले गेले. या अनपेक्षित घडामोडीमुळे ही राजकीय तडजोड आहे का, की एखादी सुनियोजित खेळी? असा प्रश्न वाशिमसह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

१३ जानेवारी रोजी उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. नगरपरिषदेत भाजप आणि महाविकास आघाडी यांच्याकडे स्पष्ट बहुमत नसल्याने उपाध्यक्षपदासाठी पेच निर्माण झाला होता. भाजपचे १४, उद्धवसेनेचे १३, काँग्रेसचे २, एमआयएम चे २ तर १ अपक्ष नगरसेवक असे संख्याबळ होते. १७ हा बहुमताचा जादुई आकडा कुणाकडेच नसल्याने राजकीय घडामोडींना वेग आला होता. महाविकास आघाडीकडे एकूण १५ नगरसेवक असल्याने सुरुवातीला त्यांचे पारडे जड मानले जात होते. मात्र, भाजपने उमेदवार न दिल्याने मतदानाची वेळच आली नाही. परिणामी, कोण कोणासोबत उभे राहिले असते, हे  स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत एमआयएमचे दोन नगरसेवक अनुपस्थित होते. अशा परिस्थितीतही भाजपने रणांगणात न उतरता माघार घेणे, राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे.   भाजपने उपाध्यक्षपदासाठी उमेदवार न देता अप्रत्यक्षपणे उद्धवसेनेला मदत केली का? एमआयएमला सत्तेच्या गणितापासून दूर ठेवण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे  जिल्ह्यात इतर ठिकाणी उपाध्यक्षपदासाठी विरोधी पक्षांनी उमेदवार दिले असताना, वाशिममध्ये १४ नगरसेवक आणि नगराध्यक्ष असूनही भाजपने उमेदवार न देणे हा निव्वळ योगायोग नसून सुनियोजित तडजोड असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »