गंगापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असून, या शताब्दी वर्षानिमित्त गंगापूर शहरात शुक्रवार, १६ जानेवारी रोजी पहिले हिंदू महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार, 12 जानेवारी रोजी धर्मध्वजारोहण व संमेलन स्तंभाचे पूजन करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी हिंदू महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या महासंमेलनासाठी गंगापूर शहरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातून दुचाकी वाहन रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, जिजामाता चौक, मारुती मंदिर, राजीव गांधी चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जिल्हा परिषद मैदानावरील संमेलन स्थळी पोहोचून रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी ह.भ.प. जनार्दन मेटे महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करुन संमेलन स्तंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. अविनाश महाराज जाधव, ह.भ.प. संदीप महाराज कडवे, संमेलन नियोजन समितीचे अध्यक्ष कृष्णा मनाळ, विहिंपचे जिल्हा मंत्री सचिन राहणे, पुरोहित उमेश जोशी, पांडुरंग खोचे, तसेच पुरुषोत्तम गोसावी, गोरखनाथ जावळे, बाळासाहेब गावंडे, मिरा जाधव, सुनील चक्रे, मनोज वाकळे, सागर नावंदर, शाम दायमा, बापू कुलकर्णी, प्रदीप पाटील, ॲड. योगेश जाधव, दत्तात्रय साबणे, रविराज दारूंटे, वाल्मिक मनोरकर आदींची उपस्थिती होती.