बुलढाणा : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १८१ जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल रोडस्थित पांडुरंग लॉन येथे रविवारी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत हे रक्तदान शिबिर पार पडले. तत्पूर्वी शहरातील प्रमुख मार्गातून रक्तदान जनजागृती काढण्यात आली होती.

बुलढाणा : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १८१ जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल रोडस्थित पांडुरंग लॉन येथे रविवारी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत हे रक्तदान शिबिर पार पडले. तत्पूर्वी शहरातील प्रमुख मार्गातून रक्तदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती.
संपूर्ण जगभरामध्ये रक्त संकलनात निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन ही संस्था अग्रेसर मानली जाते. याशिवाय, मानवतेचे हित जोपासणारे अनेकविध उपक्रम संत निरंकारी मंडळातर्फे राबविण्यात येतात. मिशनच्या विद्यमान सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज संपूर्ण मानवजातीला विश्व बंधुत्वाचा संदेश देत आहेत. निरंकारी मंडळाच्या रक्तपरंपरेला प्रदीर्घ इतिहास आहे, त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही हे शिबिर बुलढाणात पार पडले. सर्वप्रथम, सकाळी आठ वाजता शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक अशा मार्गाने जनजागृती रॅली काढण्यात आली होती. याद्वारे, शहरवासीयांना रक्तदानासाठी आवाहन करण्यात आले. त्यानंतर पांडुरंग लॉंन येथे नवनिर्वाचित नगरसेवक सचिन गायकवाड, रामेश्वर वावरे तसेच निरंकारी मंडळाचे जिल्हा संयोजक शालिग्राम चवरे, बुलढाणा ब्रांच प्रमुख हनुमान भोसले यांच्याहस्ते लाल फीत कापून शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रास्ताविकातून जिल्हा संयोजक शालिग्राम चवरे यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. मान्यवरांची भाषणे देखील झाली, यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात झाली होती. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत एकूण १८१ जणांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभाग तसेच अकोला विभागाने परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सेवादल शिक्षक सुभाष राजपूत यांनी केले. याप्रसंगी, येळगावचे सरपंच दादा लवकर, सुमंता इंगळे यांसह निरंकारी परिवारातील सेवादल मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी 6 ते 9 या दरम्यान नारायण चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यात्मिक सत्संग सोहळा पार पडणार आहे.
