dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

‘त्या’ ऑटोचालकाच्या मृत्यू प्रकरणाला कलाटणी; पत्नीच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल, एकास अटक

मलकापूर : दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत आढळलेल्या ऑटोचालकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने अखेर नाट्यमय वळण घेतले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू (मर्ग) म्हणून नोंद झालेल्या या घटनेत आता थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मलकापूर : दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत आढळलेल्या ऑटोचालकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने अखेर नाट्यमय वळण घेतले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू (मर्ग) म्हणून नोंद झालेल्या या घटनेत आता थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

धरणगाव (ता. मलकापूर) येथील ऑटोचालक अमोल भाऊराव भवरे (३५) यांचा मृतदेह ८ जानेवारी रोजी सकाळी शिवनी तालसवाडा रोडवर आढळून आला होता. मृतदेहाच्या गळ्यावर दोरीने आवळल्याचे स्पष्ट व्रण, तोंडातून रक्तस्राव, तसेच एका हाताला फ्रैक्चर आढळून आल्याने हत्या करून मृतदेह रस्त्यावर टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, सुरुवातीला कुटुंबीयांनी कोणावरही संशय नसल्याचे सांगितल्याने पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. दरम्यान, मृतकाची पत्नी शितल अमोल भवरे (३२) यांनी दिलेल्या फिर्यादीने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, ७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी दिनेश तायडे याचा अमोलला फोन आला होता. फोनवर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर “दिनेशचा फोन आला आहे, मी शेताकडे जातो,” असे सांगून अमोल रागाच्या भरात ऑटोरिक्षा घेऊन घरातून निघून गेला. मात्र, तो पुन्हा घरी परतलाच नाही. या फिर्यादीच्या आधारे दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी दिनेश तायडे याला अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा खून झाल्याची चर्चा असून या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top