dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पैशाच्या वादातून मित्राचा खून, सहा जण पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर :  मोबाइल व पैसे घेतल्याच्या संशयातून मित्रांनीच एका मित्राला डोंगरावर नेत गळा चिरून हत्या केली. त्याआधी त्यांनी त्याच्या पायाला सिगारेटचे चटके दिले, डोळ्यांना पट्टी बांधून मारहाण केली. हा प्रकार मंगळवार, ६ जानेवारी रोजी जटवाडा परिसरातील ऊर्जा भूमी येथील डोंगरात घडला.

छत्रपती संभाजीनगर :  मोबाइल व पैसे घेतल्याच्या संशयातून मित्रांनीच एका मित्राला डोंगरावर नेत गळा चिरून हत्या केली. त्याआधी त्यांनी त्याच्या पायाला सिगारेटचे चटके दिले, डोळ्यांना पट्टी बांधून मारहाण केली. हा प्रकार मंगळवार, ६ जानेवारी रोजी जटवाडा परिसरातील ऊर्जा भूमी येथील डोंगरात घडला. प्रकरणी सय्यद सिराज अली सय्यद नसेर अली ऊर्फ मोठा सिराज यास अटक केली, तर छावणी ठाण्यात त्याच्यासह छोटा सिराज, जब्बार, कबीर व अन्य एक अशा एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल केला.

शकील आरेफ शेख (३०, रा. फुलेनगर) असे मृताचे नाव आहे. मृताचा भाऊ सलमान आरेफ शेख याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात आरोपी सिराजने शकील धमकी दिली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top